हृदयाच्या गंभीर आजाराने त्रस्त गरीब महिला खटाबाई यांच्यासाठी संस्थेचे अध्यक्ष युवराज फकिरा खोकरे यांनी कागदपत्रे गोळा करून नाशिक येथे जीवनदायी योजनेअंतर्गत १ लाख २० हजार रुपये मंजूर करून घेतले. शिर्डी साई संस्थानच्या रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिष अग्रवाल यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया होईपर्यंत युवराज स्वतः शिर्डी येथे थांबले. तोपर्यंत संस्थेने १० रुग्णांना जीवदान दिले होते.



