मुख्य मजकुराकडे जा
17 ऑक्टोबर 2026  •  दैनिक देशदूत (जळगाव आवृत्ती)

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार — मानव सेवा बहुउद्देशीय संस्था, एरंडोल
आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय आणि निस्वार्थ कार्याबद्दल एरंडोल येथील आरोग्यदूत व मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष युवराज उर्फ विक्की खोकरे यांना शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे “शरदरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. दादर (मुंबई) येथील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या सोहळ्यात शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गेल्या १६ वर्षांपासून ग्रामीण व गरजू भागातील रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देणे, शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हजारो रुग्णांना उपचार मिळवून देणे, शासकीय आरोग्य योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि कोरोना काळातील कार्य यांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.

इतर बातम्या

5 ऑक्टोबर 2026

एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी

वाचा
24 सप्टेंबर 2026

दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार

वाचा
31 ऑगस्ट 2026

सामाजिक कार्याला तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज : मनिषकुमार गायकवाड

वाचा