मुख्य मजकुराकडे जा
देणगी

तुमची छोटी मदत, मोठा बदल

UPI, QR code किंवा बँक ट्रान्सफरने मदत करा. त्यानंतर UTR क्रमांक आणि screenshot पाठवा — पडताळणीनंतर नोंद पूर्ण होईल.

आमचा संकल्प

तुमची मदत, गरिबांचे हॉस्पिटल

आजपर्यंतच्या सेवाप्रवासातून मिळालेला अनुभव आणि हजारो गरजू रुग्णांच्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही एरंडोल येथे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केला आहे. या माध्यमातून गरीब रुग्णांना सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

हा केवळ एक संकल्प नाही, तर हजारो असहाय्य जीव वाचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योजक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सेवाभावी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

आपले छोटेसे योगदान एखाद्या रुग्णासाठी जीवनदान ठरू शकते. चला, मानवतेच्या या सेवायज्ञात सहभागी होऊया आणि पीडितांच्या सेवेतून ईश्वराची अनुभूती घेऊया!

Payment करा

खालील UPI ID / QR / बँक खात्यावर रक्कम पाठवा.

तपशील पाठवा

UTR क्रमांक आणि payment screenshot फॉर्ममध्ये भरा.

पडताळणी

संस्था तपासून तुमची देणगी नोंदवते व संपर्क करते.

नेहमीचे प्रश्न

देणगीबद्दल शंका?

देणगी कुठे जमा होते?

सर्व देणगी थेट “MANAV SEVA BAHUUDDESHIY SANSTHA ERANDOL” या संस्थेच्या Central Bank of India खात्यात जमा होते. कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी खात्यात पैसे पाठवू नका.

Payment केल्यानंतर काय करावे?

वरील फॉर्ममध्ये UTR / Transaction क्रमांक आणि screenshot पाठवा. संस्था तपासणी करून तुमची देणगी नोंदवते आणि आवश्यक असल्यास संपर्क करते.

UTR क्रमांक कुठे मिळतो?

PhonePe / Google Pay / Paytm मधील payment history मध्ये व्यवहार उघडा — तेथे 12 अंकी UTR / UPI Ref. No. दिसतो.

वस्तुरूप मदत करता येईल का?

हो. अन्नधान्य, कपडे, शालेय साहित्य, औषधे इत्यादी देण्यासाठी संपर्क करा किंवा WhatsApp करा.

वाढदिवस / स्मृतिदिनानिमित्त देणगी देता येईल का?

नक्कीच. फॉर्मच्या “संदेश” मध्ये प्रसंग लिहा — त्या निमित्ताने उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जाईल.

पारदर्शकता

तुमच्या मदतीचा सन्मान

प्रत्येक देणगीची सुरक्षित नोंद ठेवली जाते, पडताळणीनंतर status अद्ययावत केला जातो आणि संस्थेची प्रमाणपत्रे सार्वजनिकरित्या पाहता येतात.