एरंडोल तालुक्यातील सीमेवर सेवा बजावणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना आपत्कालीन परिस्थितीत मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याचा संकल्प आरोग्यदूत विक्की खोकरे यांनी केला आहे.
मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेमार्फत एरंडोल तालुक्यातील अनेक रुग्णांना जळगाव, मुंबई, पुणे, औरंगाबाद, शिर्डी येथील रुग्णालयात नेऊन उपचार मिळवून देण्यात आले आहेत. कोरोना काळात स्वतः व कुटुंबीय पॉझिटिव्ह असूनही १४ दिवसांच्या उपचारानंतर ते पुन्हा रुग्णसेवेत सज्ज झाले. रुग्णांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना रुग्णालयात दाखल करणे आणि बरे झाल्यावर घरी पोहोचवणे ही कामेही ते करतात.



